Posts

एक शेतकरी

Image
एक शेतकरी ============          रोज उत्पन्न वाढेल या आशेवर कोणी काय सांगेल ते प्रयोग करून अंगावर कर्ज वाढवून ठेवायचं काम शेतकऱ्यां कडून चालू आहे.          आज यश मिळेल , उद्या नफा होईल , हे केले तर पान रूंद होतात , ते केले तर पांढऱ्या मुळ्या सुटतात , अमुक फवारणी केली की वजन वाढते , अमुक खते घेतली की फुटवे चांगले निघतात. सगळे शेतकऱ्यांची फसवणूक करून पैसे कमावणारेच ….        रास्त भाव , हमी भाव , एम एस पी , स्वामीनाथन , रंगनाथन ही मागणी केली की योग्य दर मिळेल , तो आयोग लागू झाला पाहिजे , मग उत्पन्न दिडपट मिळेल. असे ऐकून ऐकून दर वर्षी अनुभव घेत देत फक्त कर्ज वाढत गेले भावा , तुमची पोस्ट वाचली आणि कमेंट करावं वाटल , खरच किती वर्षे हे प्रयोग करत जायचे ?         एक एक प्रयोग फेल गेला की , नशीबाला दोष देत एक एक वावर कधी विकले कळालच नाही. कर्ज काढून पाण्यासाठी पाईपलाईन केली , घरच औत असल तर नांगरट चांगली होते.. ट्रॅक्टर घेतला , शेणखता साठी जनावर केली , शेतीला जोडधंदा असावा म्हणून कोंबड्या -...